करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी दिवसा चोरी करणा-या विधी संघर्ष बालकाच्या ताब्यातुन चोरीतील 75,000/- रूपये किंमतीची मोटारसायकल जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी दिवसा चोरी करणा-या विधी संघर्ष बालकाच्या ताब्यातुन चोरीतील 75,000/- रूपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.यात हकीकत अशी की दि. 19/07/2025 रोजी 05/00 वाचे सुमारास फिर्यादी भाऊ महादेव भिलारे वय 40 वर्षे रा. शिवाजीनगर करमाळा ता करमाळा जि सोलापुर यांनी दि. 13/07/2025 रोजी दुपारी 02/30 ते 03/30 वाचे दरम्यान आपले राहते घराच्या गेट मध्ये आपली काळा रंगाची त्यावर लाल निळ्या रंगाचा पट्टा असलेली होन्डा कंपनीची सी.वी शाईन तिचा आर.टी.ओ.नं. एम.एच.25 ए.बी.7719 असलेली मोटारसायकल फिर्यादिच्या राहते घराच्या गेटमधुन अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या संमती वाचुन चोरून गेली आहेत. अशा आशयाची हकिकत सांगत असल्याने करमाळा पोलीस ठाणे गु.र. नं 584/2025 भारतीय न्यांय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर फिर्यादिचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांना सदर गुन्ह्यातील आरोपीची मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सुचना देऊन गुनी तपासाच्या अनुषांगाने तपास करण्यासाठी पथक तयार करून हद्दीत रवाना केले. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर पथकानी तात्काळ योग्य असा सापळा लावुन त्या आरोपीस पकडले. त्यावेळी त्याचे व गाव विचारले असता तो विधीसंघर्ष बालक असल्याचे समजले त्यावेळी त्याचे ताब्यातुन मोटारसायकल जप्त केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ मोहोळकर हे करत आहेतसदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोको अर्जुन गोसावी, पोकॉ स्वप्नील शेरखाने, पोका रविराज गटकुळ, पोकॉ अमोल रंदिल, पोकॉ योगेश येवल मिलीद दहिहांडे, गणेश खोटे, राहुल भराटे यांनी केली आहे.


