करमाळा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री धुळाभाऊ कोकरे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री धुळाभाऊ कोकरे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित 

२६ जुलै २०२५ रोजी पुणे येथे पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी राज्यस्तरीय जयंती उत्सवात, विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे एक विशेष आकर्षण ठरले उजनी बॅकवॉटर परिसरातील कुगाव येथील प्रगतशील शेतकरी मा. श्री. धुळाभाऊ कोकरे यांचा गौरव त्यांच्या कोकरे आयलॅन्ड कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील आधुनिक शेती, AI तंत्रज्ञानाचा वापर, निर्यातक्षम उत्पादन, पर्यावरणपूरक शेती, आणि कृषी पर्यटनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना मा ना अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा ना दत्तात्रय मामा भरणे क्रीडामंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

धुळाभाऊंनी पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओलांडून, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत एक नव दृष्टीकोनातून शेती मॉडेल उभं केलं आहे.
AI (Artificial Intelligence) चा शेतीत वापर करून, हवामान भाकीत, पीक आरोग्य निरीक्षण, खत वापर नियोजन व कीड व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेला वैज्ञानिक आधार दिला आहे.
त्यांच्या शेतात संपूर्ण १००% ड्रिप सिंचन प्रणाली कार्यरत आहे. यामुळे जलसंपत्तीचा अत्यंत कार्यक्षम वापर केला जातो.
शेतात बसवलेल्या सेन्सर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मातीची स्थिती, आर्द्रता, तापमान व खत गरज यावर आधारित निर्णय घेतले जातात.
ही शेती आता केवळ स्थानिक गरज भागवणारी न राहता उत्पादनक्षम, निर्यातक्षम आणि शिक्षणक्षम मॉडेल शेती ठरली आहे.
त्यांच्या शेतातून तयार होणारी केळी आज निर्यातक्षम दर्जाची आहे.
उसाचे विक्रमी उत्पादन हे देखील त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा नमुना आहे.
शेताच्या बांधावर नारळ, आंबा, चिकू, चिंच यासारख्या बहुपीक झाडांची लागवड करून त्यांनी बायोडायव्हर्सिटी संवर्धनासोबतच आर्थिक शाश्वततेचा मार्ग शोधला आहे.
धुळाभाऊ केवळ शेती करून थांबले नाही, तर त्यांनी आपल्या परिसराच्या भौगोलिक, नैसर्गिक आणि आर्थिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून एक नवे मॉडेल तयार केले *कृषी पर्यटन*
उजनी बॅकवॉटरचा किनारा लाभल्याने त्यांनी बोटींगची सुविधा सुरू केली.
त्यांच्या शेतात शाळा, महाविद्यालये आणि कृषी विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी येतात.
पर्यटक व अभ्यासकांना शेतीत वापरले जाणारे AI तंत्र, ड्रिप सिंचन, खत व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पाहायला मिळते.
या उपक्रमातून स्थानिक रोजगार, पर्यावरण संवर्धन, व शेतीविषयक जागरूकता वाढते.

*श्री धुळाभाऊ कोकरे यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी राज्यस्तरीय जयंती उत्सवात मा ना अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री धुळाभाऊ कोकरे यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत असल्याचे मत व्यक्त केले.*

error: Don\'t try to copy. Content is protected !!