करमाळा

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारे वाहन व आरोपी जेरबंद -11,21,750 /- रू. चा मुददेमाल हस्तगत

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारे वाहन व आरोपी जेरबंद -11,21,750 /- रू. चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.यात हकीकत अशी की दि. 28/07/2025 रोजी रात्री गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक महिंद्रा कंपनीची मराझो पांढ-या रंगाची गाडी हि अतिशय वेगाने व संशायित असल्याचे बातमीदाराने सागितल्याने तशी खात्रीलायक माहीती पोलीस निरीक्षक रणजित माने यांना माहीती मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सुचना देऊन त्या वाहनाबाबत माहीती देऊन रवाना केले असता रात्री 01/30 वा.चे सुमारास वरील वर्णनाची व रंगाचे वाहन करमाळा कडुन जातेगाव कडे जात असल्याचे समजल्याने त्या वाहनाचा खाजगी वाहनाने पाठलाग करून पकडले. तिचा आर.टि.ओ. नं. MH 20 FU 7246 असा आसुन चालकास आमची ओळख सांगुन वाहन चालवणा-या इसमाला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नावे सांगताना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे सदर गाडीमध्ये मध्ये काय माल आहे हे पाहीले असता त्यामध्ये हिरव्या व तपकिरी रंगाच्या गोण्या दिसून आल्या, सदर गोणी उघडून पाहीली असता त्यामध्ये हिरा कंपनीच्या सुगंधी तंबाखु व गुटख्याची पाकीटे दिसून आली, त्यामुळे सदर इसमाला सह ताब्यात घेउन करमाळा पोलीस ठाणे आणले असता.

त्यामध्ये खालील वर्णनाचा किंमतीचा गुटखा मिळुन आला.

1) 2,14,500 /- रूपये हिरा पानमसाला 1650 पाकीटे प्रत्येकी 130 रू प्रमाणे.

2) 10,7250/-रुपये रॉवल 714 तंबाखु 1650 पाकीटे प्रत्येकी 65 रू प्रमाणे.

3) 800000 /- रुपये महिंद्रा मराझो आर.टि. ओ. नं. MH 20 FU 7246 असा असलेली.

सदर मुददेमालाची खात्री करून त्या इसमास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजेंद्र विनायक बाविसकर वय 40 वर्षे रा. देवडाई, ता. जि. संभाजीनगर असे सांगितले

त्यावेळी सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन, म राज्य सोलापूर प्रशासकीय इमारत जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर दुसरा मजला, सोलापूर यांना कळविल्याने श्रीमती रेणुका रमेश पाटील वय.38 वर्षे व्यवसाय. नोकरी, रा. सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन, म राज्य सोलापूर प्रशासकीय इमारत जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर दुसरा मजला, सोलापूर यांनी समक्ष हजर राहुन करमाळा पोलीस ठाणे गु.र.क्र.619/2025 भा.न्य.सं. कलम 223,274,275,123, व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम 26(2)(1), 26(2)(2), 27(3) (ई), वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोना /1162 पवार हे करत आहेत.सदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ / 1648 अजित उबाळे, पोना 1162 मनिष पवार, पोकॉ/961 गणेश खोटे पोकॉ 856 अर्जुन गोसावी, पोकॉ/1142 स्वप्नील शेरखाने, पोकॉ/438 रविराज गटकुळ, पोकॉ/1524 अमोल रंदिल, पोकॉ/689 योगेश येवले, पोकॉ/168 मिलिंद दहिहांडे, तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोहेका / 222 व्यकंटेश मोरे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!