प्रा. डॉ.महेश निकत सर यांना शिक्षक दिनानिमित्त क्रांतीसुर्य शिक्षणरत्न पुरस्कार 2025 प्रदान

करमाळा प्रतिनिधी : ध्यास विकासाचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा असे ब्रीदवाक्य असलेले क्रांतीसुर्य शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजित क्रांतीसुर्य कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2025 मधील क्रांतीसुर्य शिक्षणरत्न कार्यगौरव पुरस्कार 2025 प्रा डॉ महेश निकत सर यांना दिनांक 4 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे त्यानंतर समाजश्री दीपक दादा पाटील संस्थापक अध्यक्ष कानसा वारणा फाउंडेशन करमाळा, सौ प्रभावतीताई घोगरे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिर्डी विधानसभा , मा.संदीप सोनवणे अध्यक्ष राहता तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , मा. देवेंद्र संपतराव इथापे मानकरी प्रतिनिधी सातारा हे होते. शिक्षण क्षेत्रात मागास असलेल्या करमाळा तालुक्यात शैक्षणिक कार्याची ज्ञानगंगा कायम तेवत ठेवण्याचे कार्य प्रा. डॉ निकत सर यांच्या माध्यमातून होत आहे. याची दखल घेऊन क्रांतीसुर्य शेती व शिक्षण विकास संस्था यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता.त्याचे वितरण आज साईबाबा च्या पावन असलेल्या शिर्डी येथे झाले.


