करमाळा

करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता संप्पन होणार – सौ रश्मी दिदी बागल महिला प्रदेश उपाध्यक्षा भाजप

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता विद्यानगर करमाळा येथे संपन्न होतील अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मीदिदी बागल यांनी आज येथे दिली याबाबत अधिक माहिती देताना रश्मीदिदी बागल म्हणाल्या की करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या म्हणजे रविवारी दुपारी 1 वाजता करमाळा विद्यानगर येथे तर सकाळी अकरा वाजता कुर्डुवाडी येथे संपन्न होतील या मुलाखती घेण्यासाठी पक्षनिरीक्षक म्हणून अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान विधानसभा सदस्य माननीय आमदार सचिनजी कल्याणशेट्टी साहेब तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंहजी केदारसाहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी इच्छुकांनी उद्या दुपारी 1 वाजता विद्यानगर येथे वेळेवर उपस्थित रहावे. तसेच ज्या महिला इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी स्वतः मुलाखतीसाठी उपस्थित राहावे अन्य प्रतिनिधीस पाठवू नये असे आवाहन भाजपा महिला प्रदेश उपअध्यक्षा रश्मीदिदी बागल यांनी केले. करमाळा नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असून देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतला सक्षम भारत सुदृढ स्वच्छ भारत देश घडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषद निवडणुकीत सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने व जनतेच्या आशीर्वादावर निश्चितपणे आम्ही घवघवीत यश संपादन करू असा विश्वास शेवटी महिला प्रदेश भाजपा उपाध्यक्षा रश्मीदिदी बागल यांनी व्यक्त केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!