यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समितीत करमाळ्याचे सुपुत्र संजय सरवदे यांची शिलेदार म्हणून नियुक्ती*

करमाळा प्रतिनिधी किल्ले वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे स्थापन करण्यात आलेल्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समितीमध्ये घारगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील श्री संजय दगडू सरवदे यांची शिलेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती समितीचे प्रमुख व होळकर राजे घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते करण्यात आली. या निवडीमुळे महोत्सवाच्या यशस्वी आयोजनास निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. संजय सरवदे म्हणाले की, “महाराज यशवंतराव होळकर राजे यांच्या प्रथम राज्याभिषेक महोत्सव समितीत शिलेदार म्हणून नियुक्ती करून मला जो सन्मान देण्यात आला, त्याबद्दल मी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचा मनःपूर्वक आभारी आहे. दिलेली जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने व समाजहिताच्या भावनेने पार पाडेन. महाराज यशवंतराव होळकर राजे यांच्या विचारांचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन. ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ पद नसून, सेवेची व प्रेरणेची संधी आहे.”
या नियुक्तीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


