Wednesday, February 18, 2026
Latest:
करमाळा

एनसीसीएफमार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू मांगी विठ्ठल सहकारी संस्था केंद्राला मंजुरी मिळाली — चेअरमन सुजित बागल

करमाळा प्रतिनिधी हंगाम २०२५-२६ मध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेऊन National Cooperative Consumers’ Federation of India (एनसीसीएफ) मार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि., जिल्हा विपणन अधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे, मांगी येथील खरेदी केंद्राला मंजुरी मिळाल्याची माहिती चेअरमन सुजित बागल यांनी दिली.
मांगी (ता. करमाळा) येथील विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेचे खरेदी केंद्र एनसीसीएफमार्फत तूर खरेदीसाठी मंजूर करण्यात आले असून, संबंधित केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना आपला तूर हमीभावाने विक्री करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तूर विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे:
सन २०२५-२६ मधील तुरीची नोंद असलेला सातबारा उतारा
आधार कार्ड
बँक पासबुकची प्रत
आठ-अ उतारा
नोंदणी कालावधी दि. २० जानेवारी २०२६ ते दि. २० फेब्रुवारी २०२६ असा निश्चित करण्यात आला असून, प्रशासनाच्या सूचनेनुसार या कालावधीत नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी वेळेत नोंदणी करून शासनाच्या खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुजित बागल यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!