डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्यरत राहणार करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांची घोषणा; कार्यकारिणी जाहीर
करमाळा प्रतिनिधी
डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, महाराष्ट्रच्या करमाळा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची पुढील वाटचाल होणार असल्याचे सांगण्यात आले.
नवीन कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी सूर्यकांत होनप व संजय साखरे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिवपदी तुषार जाधव, तालुका प्रवक्तेपदी नितीन झिंजाडे, तालुका संघटकपदी समाधान फडतरे, सहसंघटकपदी शुभम सूर्यपुजारी, तालुका कार्यवाहपदी रविंद्र विघ्ने, सहकार्यवाहपदी अंगद देवकते, खजिनदारपदी सागर गायकवाड सहखजिनदार राजु सय्यद,तालुका संपर्कप्रमुखपदी गौरव मोरे, सहसंपर्कप्रमुख हरीभाऊ हिरडे व्यवस्थापकपदी संजय तेली आणि प्रसिद्धीप्रमुखपदी सचिन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार म्हणून नासिर कबीर, ॲड. बाबुराव हिरडे, अशोक नरसाळे अलीम शेख डी. जी. पाखरे यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदेशीर सल्लागार म्हणून अजित विघ्ने यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीच्या सर्व सदस्यांचा निवड नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय मस्कर , प्रा. राजेश गायकवाड नंदकिशोर वलटे, नागेश चेंडगे, धनंजय पाटील, राहुल रामदासी, ॲड. सचिन हिरडे, बाळासाहेब सरडे, , हरिभाऊ पिंपळे आणि युवराज जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे.
बैठकीत ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी संघटना ही पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी व कल्याणासाठी झटणारी संघटना असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल माध्यमातील पत्रकारांना शासकीय मान्यता, संरक्षण व विविध सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी निर्भयपणे कार्य करावे, संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांनीही संघटनेच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा देत डिजिटल माध्यमातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री स्व .अजित दादा पवार यांनी शासनमान्यता मिळवून दिली आहे डिजिटल मीडियालाही प्रिंट मीडियाप्रमाणे शासकीय जाहिराती व अधिस्वीकृती मिळावी यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून वैद्यकीय मदत,मुला मुलींच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत भरघोस मदत देण्यात आली आहे.पत्रकारांच्या संपूर्ण कुटुंबासाठी वैद्यकीय उपचारासाठी दहा लाख रुपयांच्या वैद्यकीय सहाय्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
पत्रकार सुरक्षा विमा योजना, पत्रकार कुटुंब कल्याण योजना, पेन्शन योजना तसेच टोल माफीसाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. संघटनेचा विस्तार ‘अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना’ या नावाने करण्यात येत असून एप्रिल महिन्यात भव्य अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांची शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या कल्याण व संरक्षणासाठी संघटना कटिबद्ध राहील, असा विश्वास तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केला आहे.


