Friday, March 20, 2026
करमाळा

करमाळा शहरात ‘यश कलेक्शन’चा तिहेरी सणांचा फेस्टिवल धमाका; ₹2500 खरेदीवर हमखास बक्षीस

करमाळा प्रतिनिधी : गुढी पाडवा, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या तिहेरी सणांच्या उत्सवी वातावरणात करमाळा येथील ‘यश कलेक्शन’ने ग्राहकांसाठी आकर्षक “फेस्टिवल धमाका” ऑफर सुरू केली आहे. सणासुदीच्या खरेदीला अधिक रंगत आणण्यासाठी ही विशेष योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दुकानाच्या वतीने देण्यात आली.
या योजनेअंतर्गत ₹2500 किंवा त्यापेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हमखास बक्षीस दिले जाणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात नव्या फॅशनने करण्याचा संदेश देत येथे पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्सचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला असून ‘यश कलेक्शन’मध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महिलांसाठी, पुरुषांसाठी तसेच युवक-युवतींसाठी विविध ट्रेंडी व परवडणाऱ्या दरातील कपड्यांचे पर्याय येथे उपलब्ध आहेत.
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच लागू असल्याने ग्राहकांनी त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘यश कलेक्शन’ हे करमाळा येथील मेनरोडवर स्थित असून अधिक माहितीसाठी 9150311008 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!