Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुदिवसीय आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य बहुदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ३ एप्रिल २०२६ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत हे शिबिर राबविण्यात आले असून या उपक्रमास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसामान्य तपासणीसह मूळव्याध, किडनी विकार, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी विकार, फुफ्फुसांचे आजार (टीबी, दमा), हाडांचे विकार, मेंदूविकार, त्वचारोग, केसांच्या समस्या, दंतचिकित्सा, हृदयरोग तसेच लहान मुलांचे हृदयरोग अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक तपासण्या व उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.शिबिराचे वेळापत्रक सकाळी ९ ते दुपारी ३ तसेच काही दिवस दुपारी २ ते सायंकाळी ५ असे ठेवण्यात आले होते. नामांकित व अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सल्ला मिळाला. दंत तपासणी, रूट कॅनॉल व दातांच्या कव्हरवर विशेष सवलत देण्यात आली, यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेतून पार पडलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ताई ठोकडे व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.उपलब्ध आकडेवारीनुसार मूळव्याध शिबिरात ८७, किडनी व मुतखडा विकार ५४, फुफ्फुसांचे आजार २३, हाडांचे आजार ३५, लहान मुलांचे हृदयरोग २, हृदयरोग २९, केस व त्वचारोग ५८, दंत कव्हर व रूट कॅनॉल २४, मेंदूविकार २७, हृदय तपासणी २५ आणि रक्तदान शिबिरात ६६ नागरिकांनी लाभ घेतला.

सर्व शिबिरे जाधव‑पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे पार पडली. शिबिर यशस्वी होण्यासाठी सचिव श्री. अभिजित पाटील, डॉ. शिवानी पाटील, श्री. अजिंक्य पाटील, श्री. तात्यासाहेब जाधव, श्री. महादेव भोसले, श्री. प्रमोद जगदाळे, श्री. राहुल जाधव व श्री. शीतल पेटकर यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी बोलताना डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले की, आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा लाभ करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात घरच्या जवळ आरोग्यसेवा उपलब्ध होण्याचा एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!