कारगिल विजय दिनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्रा. प्रताप बरडे यांच्या शैक्षणिक कार्याचा होणार सन्मान
करमाळा, प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्रा. प्रताप बरडे यांना यंदाच्या २७ व्या कारगिल विजय दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्तप्रिय कार्यपद्धती, विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्यांची जोपासना आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता करमाळा येथील यशकल्याणी सेवा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे आणि आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील राहणार आहेत.
कार्यक्रमास तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलिस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी सचिन तपसे आजी माजी सैनिक कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी साहित्य, समाजसेवा, माजी सैनिक, युवा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे.
प्रा. प्रताप बरडे यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट अध्यापन व मार्गदर्शन केले आहे सीमेवरच्या सैनिकांना रक्षाबंधन सन आनंदात साजरा करण्यासाठी विद्यालयामार्फत राख्या पाठवण्याचा उपक्रमही ते राबवत आहेत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच रावगाव परिसरातील नागरिकांनी प्रा. प्रताप बरडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हा सन्मान करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर जिल्हा उपाध्यक्ष उत्तम हानपुडे टी डी एफचे तालुकाध्यक्ष किरण कोरपे सर यांनी अभिनंदन केले आहे


