Saturday, September 12, 2026
Latest:
Uncategorized

दत्तपेठ गणेशोत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी रितेश कटारिया यांची निवड

करमाळा प्रतिनिधी: दत्तपेठ तरुण मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी रितेश कटारिया यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी सुंदर महामुनी व धनराज महाजन यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी भणगे, तर खजिनदारपदी हर्षा घोडेगावकर व अजिंक्य महाजन यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या आगामी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. विशेषतः उत्सव काळातील मिरवणुका शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने पार पाडण्यासाठी मिरवणूक प्रमुख म्हणून मनोज भणगे व शिवम तांगडे यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून परिसरातील युवकांना एकत्रित करून सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक आयोजन तसेच परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विधायक कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या निवडीप्रसंगी नगरसेवक विक्रम परदेशी, अमोल परदेशी, अभय महाजन, संग्राम देशमुख, अरुण टांगडे, प्रदीप देवी, संकेत खाटेर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर व सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!