करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माध्यमिक शिक्षक संघटना टिडीएफच्यावतीने शिक्षक नेते पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार*
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव, व्हाईस चेअरमनपदी निशांत खारगे तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक संघटना व टीडीएफच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे विभागीय टीडीएफचे उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा टीडीएफचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह माध्यमिक शिक्षक संघटना व टीडीएफचे पदाधिकारी आणि शिक्षक बांधव उपस्थित होते.
यावेळी मुकुंद साळुंखे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . यावेळी मुकुंद साळुंखे सर यांनी शिक्षकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण, सभासदांना उत्तम सुविधा आणि संस्थेचा पारदर्शक कारभार यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.
शिक्षकांच्या सहकार क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण संस्थेची प्रगती साधताना सर्व सभासदांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या सत्कार समारंभातून शिक्षक संघटना आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांमधील स्नेहभाव व एकजुटीचे दर्शन घडले आहे.


