Monday, April 21, 2025
Latest:
Uncategorized

जनतेच्या प्रश्नांबाबत अहोरात्र तत्पर आमदार : संजयमामा शिंदे!

करमाळा प्रतिनिधी :-.                                     करमाळा तालुका व मतदारसंघातील प्रश्न व सार्वजनिक हिताबाबत आमदार संजयमामा शिंदे हे किती कार्यतत्पर आहेत याचा अनुभव आज ज्येष्ठ पत्रकार,मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी स्वतः अनुभवला.याविषयी माहिती देताना येवले हे म्हणाले, मी काल शुक्रवार दि.29 ऑक्टोबर रोजी अ‍ॅन्टी रेबीजची लस घेण्यासाठी सायंकाळी सातच्या सुमारास करमाळा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात गेलो असताना अचानक संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा जवळपास अर्धा तास खंडित झाला व त्यामुळे पूर्ण रूग्णालयात काळोख पसरलेला होता. ही अवस्था पाहून मी आज शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास संजयमामांशी संपर्क साधला आणि अवघ्या तासाभरातच चक्रे फिरली आणि यंत्रणा खडबडून कामाला लागली आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास मला रुग्णालयाचे डाॅ.राहूल कोळेकर यांनी फोन करून रुग्णालयामध्ये पहिले दोन इन्व्हर्टर कार्यान्वित असून पूर्ण क्षमतेचे आणखी चार इन्व्हर्टर तातडीने आमदार संजयमामांच्या आदेश व सूचनेनुसार बसवून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती दिली तसेच ऑपरेशन थिएटरसाठी लागणारा पूर्ण क्षमतेचा जनरेटर अहोरात्र कार्यान्वित असून रुग्णालयाचे प्रशासन रुग्णांच्या सेवेसाठी अखंड कार्यक्षम व कार्यरत असल्याची हमी दिली तसेच संजयमामांच्या मार्गदर्शनाखाली सिझेरियन ऑपरेशन,ऑक्सिजन प्लॅन्ट,डिजिटल एक्स-रे सुविधा,नियमित व पुरेसा औषधपुरवठा तसेच मामांनी नुकतीच मंजूर करून घेतलेली डायलेसिस सुविधा याचा लाभ रूग्णांना देण्यासाठी रूग्णालय प्रशासन कटिबद्ध असून सेवा-सुविधा मिळण्याबाबत काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डाॅ.कोळेकर यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group