सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक बागल गट ताकदीने लढविणार-दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा दुध संघाची निवडणूक बागल गट ताकदीने लढवणार असल्याचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले. पहिल्यापासून दूध संघाच्या बाबतीमध्ये दूध संस्थांवर स्व. दिगंबरराव बागल मामांपासून वर्चस्व राहिले आहे. तालुक्यातील बहुतांश संस्था ह्या बागल गटाच्या सोबत राहिलेल्या आहेत आणि यापुढेही असतील. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून यासोबत बागल गटाच्या हालचाली सुद्धा वाढल्या आहेत.
त्यानुसार बागल गटाचे नेते श्री. दिग्विजय बागल यांनी दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींची मते जाणून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. बागल गटाने या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत २८ जानेवारी पर्यंत आहे. संचालक मंडळातील १७ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार असून खुल्या प्रवर्गातील बारा तर राखीव प्रवर्गातील पाच सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झालीय. दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील राजकारण्यांची स्पर्धा लागली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.सर्वानुमते उमेदवार निवडण्याचे व आगामी धोरणांचे सर्वत्र अधिकार बागल गटाचे नेते श्री. दिग्विजय बागल यांच्याकडे दिले आहेत असे यावेळी संस्था प्रतिनिधींनी सांगितले.
