करमाळा शहरातील बेकायदेशीर खाजगी सावकाराचा बंदोबस्त करण्याची नागेश दादा कांबळे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील भिमनगर, सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, सुमंत नगर, या विभागात बेकायदेशीर सावकारीने उच्चांक गाठलेला असून या सावकारकी च्या व्यवसायात काही प्रतिष्ठित महिला व पुरुष सहभागी असुन,सावकारांच्या दहशतीमुळे त्यांच्या विरोधात कंप्लेट देण्यास कोणी तयार नाही याची सखोल चौकशी करून संबंधित सावकारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे यांनी तहसीलदार पोलीस अधिकारी सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा शहरातील भिम नगर सिद्धार्थनगर आण्णाभाऊ साठेनगर भिम नगर सिद्धार्थनगर सुमंतनगर या या भागामध्ये बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात चालु आहे या ठिकाणी दलित समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव करीत असून भागविण्यासाठी मिळेल ते काम करीत आहे या विभागातील कायमस्वरूपी कर्मचारी रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करीत आहेत या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना खाजगी सावकाराचा भयंकर त्रास असल्याचे समजते पोलीस स्टेशनच्या मेहतर बांधवाची 50 ते 60 कुटूंब वास्तव्य करीत आहे. ही सर्वच कुटुंब सावकाराच्या विळख्यात अडकलेली असुन सावकाराच्या पाशातुन सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.या सावकाराकडून 10ते 20 टक्के व्याजदराने घेतले असून या कर्मचारी बांधवाकडून बँकेचे पासबुक एटीएम कार्ड घेऊन दमदाटी करून सावकार वसुली करत आहेत. मेहतर समाजातील एका महिलेने मागील दीड वर्षापूर्वी सावकाराच्या च्या कर्जापायी आत्महत्या केलेली आहे. भंगी समाजाबरोबरच मातंग समाजाची हीच अवस्था झाली असून सावकारी पाशात हे बांधव अडकलेले आहेत. सावकार आपले पोलिसांबरोबर जवळचे संबंध असल्याचे भासवून गरीब लोकांची मोठी पिळवणूक करीत आहेत. त्यामध्ये काही प्रतिष्ठित पुरुष व महिलांचाही समावेश आहे. समाजकार्याच्या नावाखाली सावकारकी करणाऱ्या या सावकाराचा ताबडतोब बंदोबस्त करावा सावकाराविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी याबाबत पोलिसांनी साध्या वेशामध्ये गुप्तपणे माहिती गोळा करून संबंधित सावकाराच्या मुसक्या आवळून संबंधित असणारे सावकार मटका व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कर्जाने पीडित असलेल्या व्यक्तींना महिला व सावकार यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे यांनी केली आहे
