करमाळा

वाशिंबे येथे उद्यापासून भैरवनाथ यात्रा उत्सव*

वाशिंबे प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून वाशिंबे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेस शनिवारी दिनांक १६ रोजी सुरुवात होत आहे व रविवार पर्यंत दि. १७ हा उत्सव चालणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे शनिवारी पहाटे धार्मिक विधीला सुरुवात होईल. दुपारी १.३० वाजता मानाच्या कावडी ची गावातील मुख्य चौकातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री पुन्हा ८ वाजता छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात निघेल. रविवार दिनांक १७ रोजी सकाळी सात वाजता पालखी सोहळा होईल दुपारी११.३० वाजता महाआरती होईल. दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.यात्रेस येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, यात्रा समिती व ग्रामस्थ करीत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group