जाधव पाटील हाॅस्पिटलच्यावतीने मोफत मुळव्याध शिबिर संप्पन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील नामांकित डॉ प्रदीप जाधव पाटील अनेक वर्षांपासून करमाळा तालुक्यातील रूग्णांची सेवा करत असुन त्यांचा वारसा यशस्वीपणे चालवणारे चिरंजीव डॉ रोहन पाटील यांनी जाधव पाटील हाॅस्पिटलच्या माध्यमातून करमाळा शहर व तालुक्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोफत मुळव्याध शिबिर नवोदय क्लिनिक अहमदनगरचे मुळव्याध व भंगेदर सर्जन डॉ प्रदिप तुपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संप्पन झाले असून या शिबिरात 360 रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. करमाळयाच्या रुग्णांना करमाळा शहरात जाधव हाॅस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार शिबिर आयोजित केल्याबद्दल रुग्णसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानुन काम करणाऱ्या डॉ रोहन जाधव पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
