आळजापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डाॅ दिपक हरीदास केवारे यांची बिनविरोध निवड*
करमाळा प्रतिनिधी आळजापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आदिनाथ कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक डाॅ हरीदास केवारे यांचे सुपुत्र डाॅ.दिपक हरीदास केवारे यांची व्हाईस चेअरमपदी भाऊसाहेब सुदाम रोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरेसाहेब,निवडणुक निर्णय अधिकारी मुंढे मॅडम,भंडारेसाहेब,डाॅ.एच.टी केवारे,सावंत गटाचे नेते सुनिल सावंत,श्री.गोरख गपाट.सरपंच रवी घोडके.उपस्थित होते. यावेळी आळजापुर विविध कार्यकारी सोसायटी सदस्य अर्चना गौतम रोडे,आण्णा संपत रोडे,रेणुका युवराज रोडे,मच्छिंद्र नवनाथ शेवाळे,राजेंद्र पंढरीनाथ गपाट,दत्तात्रय नवनाथ टेबांळे,अरुण माणिक रोडे,सौनाली विनोद रोडे,बिटाबाई हरीदास गपाट,श्रीमंत सुर्यभान काळे,पोपट दामु लोंढे उपस्थित होते.डाॅ.दिपक हरीदास केवारे यांची आळजापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.