मानाच्या संत निवृतीनाथ पालखीचे प्रशासनाच्यावतीने तहसीलदार समीर माने यांनी केले स्वागत
करमाळा प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या मनाच्या पालखीपैकी करमाळा मार्गे येणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे रावगाव येथे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार समीर माने यांनी स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते.नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरला जात आहे. शनिवारी (ता. २) दुपारी ४ वाजता सोलापूर जिल्ह्यात या पालखीचे आगमन झाले. यावेळी श्रींच्या पादुका पूजन तहसीलदार माने, पोलिस निरीक्षक कोकणे व गटविकास अधिकारी राऊत यांच्या हस्ते झाले. दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा झाला नव्हता. या वर्षी कोरोना कमी झाल्याने पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने निघाला आहे.या पालखी सोहळ्यात 25 हजार वारकरी आहे. त्यांच्यासोबत ४५ दिंड्या आहेत. तोफांच्या सलामीत पालखींचे रावगावच्या वेशीवर आगमन होताच सरपंच दादासाहेब जाधव, ग्रामविकास अधिकारी रामदास हजारे यांनी पादुका पूजन व संस्थान अध्यक्ष हभप भाऊसाहेब महाराज गंभीरे, पालखी चालक हभप मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी हभप जयंत महाराज गोसावी यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.आरोग्य विभाग, महावितरण विभाग, पोलिस प्रशासन यांनी यावेळी चोख नियोजन केले आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून रावगाव अरोग्य उपकेंद्राने सर्वतोपरी औषध उपचार व इतर स्वच्छतेची तयारी केली आहे. कोरोना तपासणीबरोबरच वारकऱ्यात जनजागृती केली जात आहे. अभियंता सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे एक पथक गावात सक्रिय आहे. वीज अखंडपणे सुरु राहावी यासाठी पथक परिश्रम घेत आहे.पोलिस स्टेशन करमाळा यांच्या वतीने योग्य व सुनियोजन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील याविषयी दक्षता घेतली. पोलिस उपनिरीक्षक मोहोळकर, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी भोंग, विस्तार अधिकारी पाटील, गाव कामगार तलाठी अनभूले, तालूकाकृषी अधिकारी संजय वाकडे, सार्वजनिक बांधकाम विभाग जाधव, पाणी पुरवठा विभाग, तालूका अरोग्य अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य ,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, गावकामगार पोलिस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
