तलाठी ग्रामसेवक,शिक्षक आरोग्य सेविका हे त्यांच्या दिलेल्या सजात राहत नसल्याबाबत प्रहार संघटनेच्यावतीने सोमनाथ जाधव यांचे निवेदन
करमाळा प्रतिनिधी तलाठी ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेविका हे त्यांच्या दिलेल्या सजात राहणे बंधनकारक असताना सजात रहात नसल्याबाबत प्रहार संघटनेच्यावतीने सोमनाथ जाधव यांनी निवेदन दिले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि करमाळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तालुक्यातील सर्व तलाठी बांधव व ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेविका हे त्यांच्या दिलेल्या सजात राहणे बंधनकारक असून देखील ते त्या सजात राहत नसले कारणाने सर्व सामान्य शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व करमाळा तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी व ग्रामसेवक, आरोग्य सेविका, शिक्षक यांनी त्यांच्या सजाचे गावी मुक्कामास राहावे तसेच जे तलाठी आणि ग्रामसेवक, आरोग्य सेविका, शिक्षक आपल्या सोयीनुसार दुसरीकडे राहत होते त्या सर्व तलाठी व ग्रामसेवक, आरोग्य सेविका, शिक्षक यांचे मागील 3 वर्षाचे घर भाडे वसूल करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे कार्यवाही न झाल्यास आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा प्रहार संघटना करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिला आहे.
