करमाळा तालुक्यातील राजुरीत उद्यापासून हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
राजुरी प्रतिनिधी
राजुरी तालुका करमाळा येथे उद्यापासून प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन व राजमुद्रा ग्रुप यांच्या वतीने भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा परिसरातील क्रीडा स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे २२,२२२ रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले असून द्वितीय बक्षीस १५,५५५तृतीय बक्षीस ११,१११ तर चतुर्थ बक्षीस ७,७७७ रुपये ठेवण्यात आलेले आहे.
सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर व उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते होणार आहे असून प्रथम क्रमांक येणाऱ्या संघास २२,२२२रुपये व राजेश्वर चषक देण्यात येणार आहे. राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयाच्या मैदानात या क्रीडा स्पर्धा भरणार असून क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घ्यावा असे आव्हान संयोजकाच्या वतीने श्रीकांत साखरे यांनी केले आहे.
