करमाळ्यात मा.वामन मेश्राम यांच्या जंगी सत्काराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे बामसेफ व भारत मूक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे नागपूर आरेसेस मुख्यालयावरिल आंदोलनानंतर प्रथमच येत असून लढवय्या नेतृत्वाचा सन्मान म्हणून आरपीआय(आ)चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे यांच्या वतीने वामन मेश्राम यांचा जंगी सत्कार सोहळा बुधवार दि30/11/22 रोजी दू 3 वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
जातीवाद व ब्राम्हणवाद तसेच दिल्ली येथे भारतीय संविधान जाळणा-या देशविघातक मनूवादी प्रवृत्तीविरुद्ध बामसेफ व भारत मूक्ती मोर्चा हि संघटना देशभर तीव्रतेने लढत आहे .त्याचाच एक भाग म्हणून आरेसेस च्या मुख्यालयावर थेट आंदोलन केले होते या यशस्वी आंदोलनानंतर प्रथमच वामन मेश्राम येत आहेत.
क्रेन द्वारे भला मोठा हार घालून सत्कार व त्यानंतर रॅली ने महापुरुषांच्या पुतळ्यांना पूष्पहार घालून बामसेफ च्या जिल्हास्तरीय शिबिरास मार्गदर्शन कार्यक्रमास नालबंद हाॅल इथं उपस्थित राहतील.
तरि सर्व बहूजन समाजबांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागेश कांबळे यांनी केले आहे.
