देवळाली गावात बिबटया आढळल्याने लाईट दिवसपाळी करण्यासाठी देवळाली ग्रामस्थाच्यावतीने वीज वितरण कंपनीस निवेदन
देवळाली प्रतिनिधी देवळाली गावात बिबट्या आढळून आला असल्यामुळे देवळाली गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी देवळाली गावातील शेतीपंपाची लाईट रात्र पाळी चालू असून ती लाईट दिवस पाळी करण्यासाठी एम एस सी बी चे अधिकारी जाधव साहेब यांना देवळाली ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जाधव साहेब यांनी उद्या दिनांक 10/02/2023 पासून देवळाली शेतीपंपाची लाईट दिवस पाळी सोडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी देवळाली गावचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर ,उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे ,बापू गुंड ,संदीप चव्हाण, माजी सरपंच आशिष गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.
