Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

चिखलठाण नं.१ येथे नेत्रदिपक शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी शिवजन्मोत्सव समिती चिखलठाण नं.१ यांच्या सयुंक्त विद्यमानाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य दिव्य शिवजन्मोत्सवाचा सोहळा संपन्न झाला. प्रशासक म्हणुन नियुक्त असलेले श्री.विलास वाघमारे,कर्तव्यदक्ष ग्रामसेवक श्री.अनिल घाडगे या मान्यवरांच्या शुभहस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.लोकनियुक्त सरपंच तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.चंद्रकांत(काका)सरडे,मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.राजेंद्र बारकुंड,ग्रामसेवक श्री.रामेश्वर गलांडे,मा.सरपंच श्री.हनुमंत सरडे,उद्योजक श्री.हेमंत बारकुंड,स्वातंत्र्य सैनिक श्री.विठ्ठल राऊत,श्री.शिवाजी पवार,श्री.उमेश पोळ,श्री.मारुती गायकवाड,श्री.आप्पासाहेब सरडे,श्री.राजेंद्र कवितके,श्री.दादासाहेब सरडे,वनरक्षक श्री.सुधीर पोळ,श्री.संदिप(बापु)सरडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्तात्रय गोळे,उपाध्यक्ष श्री.सचिन गव्हाणे, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष चि.सचिन(बापु)सरडे,उपाध्यक्ष चि.सचिन गोळे सर्व ग्रामपंचायत सदस्य,डॉक्टर,स्वातंत्र्य सैनिक,ग्रामस्थ,शिवप्रेमी तरुण तसेच शिवजन्मोत्सव समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.चिखलठाण नं.१ येथील इरा पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीनींनी नेत्रदिपक शिवकालीन मर्दानी लाठीकाठी कार्यक्रम करुन उपस्थितांची मने जिंकली.इयत्ता ४ थीमध्ये शिकत असलेल्या सुरज सचिन गव्हाणे या विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उत्कृष्ट भाषण केले.सोमवार दि.२०/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवप्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत करकंब येथील शिवरत्न मर्दानी आखाडा यांचा दांडपट्टा,तलवारबाजी,लाठीकाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group