शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त 7 मार्चला नागरी सत्कार सोहळा

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख, कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, करमाळा तालुका खत बियाणे कीटकनाशके असोसिएशनचे तथा करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश दादा नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 7 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्यावतीने अभिष्टचिंतनसोहळ्याचे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. देवीचा माळ रोड येथिल अमरनाथ टॉवर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सत्कार समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्यावतीने वतीने करण्यात आले आहे.वाढदिवस अभीष्टचिंतनाच्या या सत्कार सोहळ्यासाठी करमाळा शहरातील विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळीकरमाळा येथील आरोग्य शिबिरात तीन दिवस सेवा दिलेल्या डॉक्टरांचाही सत्कार करण्यात येणार आहे.


