करमाळासहकार

करमाळा तालुक्यातील निंभोरे सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व

:करमाळा प्रतिनिधी निभोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे . जगताप गटाचे सोसायटीचे विद्यमान चेअरमन जोतीराम तात्या वळेकर व आ संजय मामा शिंदे समर्थक रविंद्र वळेकर यांच्या नेतृत्वा खालील श्री . खंडेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनेलने बागल समर्थक आदिनाथचे संचालक अविनाश वळेकर यांच्या नेत्तृत्वा खालील पॅनेलचा दारुण पराभव केला आहे . विजयी उमेदवारांमधे जोतिराम वळेकर, रविंद्र वळेकर, नानासाहेब दळवे, मनिषा काकडे, भिमराव काळदाते, धनंजय सांगडे, अशोक वळेकर, पोपट वाघमारे ( सर्वसाधारण मतदारसंघ ) कविता वळेकर, मनिषा वाघमारे ( महिला प्रतिनिधी ) विक्रम मस्के ( अनुसूचित जाती जमाती ) किरण चांगण ( भटक्या विमुक्त जाती जमाती ) महादेव माळी ( इतर मागास वर्ग ) यांचा समावेश आहे . सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस . के . मुंढे यांनी काम पाहीले . मतदान व मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

error: Don\'t try to copy. Content is protected !!