मुक्या जनावरांची सेवा करण्याचा सुनील सावंत मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मोकाट फिरणारे मुक्या जनावरासाठी सुनील बापु सावंत मित्र मंडळाच्या वतीने जनावरांच्या पायाना पत्री ठोकण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे
यावेळी या उपक्रमाबाबत बोलताना सावंत म्हणाले की करमाळा शहरात अनेक मोकाट फिरणारे मुक्या जनावर उन्हा तान्हात फिरताना दिसत आहे त्यांचे नखे वाढलेले असुन ते ही काढण्यात आले असुन याकामी अस्लम हुसेन नालबंद,राजु नालबंद , इरफान मिर्जा रामभाऊ क्षिरसागर , असलम बेग, साजीद बेग रामभाऊ सावळकर मैनुद्दीन बेग आदी जण हां उपक्रम राबवित आहेत करमाळा शहरातील ज्या नागरीकांची जनावरे आहें त्यांनी सुध्दा आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन सांवत यांनी केले आहे