करमाळा

जालना येथील मराठा आंदोलकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आरक्षणासाठी देवळाली शंभर टक्के बंद पाळणार-आशिष गायकवाड

करमाळा प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील अंतरावली,सराटी येथे न्याय मार्गाने सुरू असलेल्या मराठा मोर्चा आंदोलनाकांवर शासनाच्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाने केलेले भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी करमाळा येथे पोथरे नाका करमाळा येथून तहसील कार्यालय करमाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केलेले आहे. मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी आपण लहान थोर व महिला भगिनींनी सदर मोर्चात सहभागी व्हावे असे देवळाली ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहेत्याचबरोबर बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे झालेल्या अन्यायाच्या विरोधात सर्व ग्रामस्थांच्या वतीने देवळाली गाव उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

*महाराष्ट्र शासनाने कायद्याच्या चौकटीत बसणारे कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण द्यावे- मा.सरपंच श्री आशिष आण्णा गायकवाड, देवळाली*

error: Don\'t try to copy. Content is protected !!