Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा गणेशोत्सव असुन समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक उपक्रमाद्वारे गणेशोत्सव साजरा करा- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी.सामाजिक एकतेचा संदेश देणारा गणेश उत्सव लोकोत्सव व्हावा या दृष्टिकोनातून गणेश उत्सवाची सुरुवात झाली असुन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने समाजाचे कल्याण करण्यासाठी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.कोंढारचिंचोली येथील गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती प्रा.रामदास झोळ सर यांच्या हस्ते करण्यात आली. कोंढारचिंचोली गणेश मंडळाच्यावतीने प्रा.रामदास झोळ सर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की गावाच्या विकासासाठी विधायक सामाजिक उपक्रमास आपण सहकार्य करणार असून ग्रामस्थांना बसण्यासाठी पाच बाकडे देण्याची घोषणा त्यांनी केली. सामाजिक बांधलिकीच्या भावनेतुन उल्लेखनीय कार्याबद्दल खातगाव येथील जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक बाळासाहेब बोडखे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .याबरोबर मेजर प्रशांत गंलाडे,घोडके सर सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच शरद भोसले,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ साळुंके,रवी खांडेकर,ज्ञानेश्वर गंलाडे,गणेश मंडळाचे अध्यक्ष शरद खांडेकर मंडळाचे कार्यकर्त सोमनाथ खांडेकर,अतिष राऊत,निखिल साळुंके,अनिकेत कांबळे कोंढारचिंचोलीचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group