Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

हजरत  महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या तर्फे  श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे अन्नदान


करमाळा प्रतिनिधी हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या तर्फे श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे ” अन्नदान वाटपाचा ” कार्यक्रम मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक दानशूर व्यक्तीमत्व युवकांचे आधारस्तंभ तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रेणिक शेठ खाटेर यांनी म्हणाले की सामाजिक कार्य करताना आपण केलेले कार्य हे समाजात आपल्या विचारांचा, आपल्या वर्तनाचा, प्रभाव लोकांच्या मनात उमटत असतात इतर समाज किंवा व्यक्ती हे त्यांचा आदर्श घेतात ते ही चांगले विचार समाजात प्रसारण करण्याचा प्रयत्न करत असतात व त्याचेच प्रतिबिंब सामाजिक सलोख्यात, सामाजिक ऐक्य व एकात्मता कायम टिकून ठेवण्यासाठी मदत होते.करमाळा शहर आणि तालुक्यातील सर्वच सामाजिक संघटना चे काम उत्तम व चांगले आहे. आज विश्वरत्न हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाचा उपक्रम जो घेतला आहे तो कौतुकास्पद आहे .कारण माणूस हा कोणत्या जाती धर्माचा आहे हे पाहिले जात नाही भुकेल्या ची भुक भागविणे, तहानलेल्या ची तहान भागविणे हेच खरे मानवधर्म जिवंत ठेवण्यासारखे आहेत. गणेश चिवटे ( जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर ) यांच्या योग्य अशा नियोजनाने श्रीराम प्रतिष्ठान चा उपक्रम चालू आहे असे उपक्रम चालु ठेवणे या साठी प्रबळ इच्छा शक्ती व स्वच्छ नितीमत्ता असणे आवश्यक आहे. करमाळा मुस्लीम समाजातील युवक या कामासाठी आपले तन मन धन सर्व काही लावुन समाजाचा नावलौकिक करत आहे अशा युवकांना आपण सर्व काही ताकत देणार आहे व यापुढेही सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कामाची पालखी वाहणार आहे या कामासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.यावेळी सचिव सुरज शेख रमजान बेग राष्ट्रवादी उपाध्यक्ष आझाद भाई शेख उपाध्यक्ष जहागिर बेग जिशान भाईजी कबीर मुस्तकीम भाई पठाण, ईमत्याज पठाण महादेव भाऊ गोसावी ( व्यवस्थापक श्रीराम प्रतिष्ठान करमाळा ) व सकल करमाळा मुस्लीम समाजातील कार्यकर्ते उपस्थिती होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group