वंजारवाडी येथे रस्ता खडीकरण कामाचा डिपडीसी सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी:-वंजारवाडी ता. करमाळा येथील वंजारवाडी गावठाण ते मधला मळा – पिंपळाचा मळा या रस्त्याच्या खडीकरणाचा शुभारंभ भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश(भाऊ) चिवटे यांच्या हस्ते संपन्न संपन्न झाले.या कामासाठी डिपिडीसी जनसुविधा निधी मधून श्री चिवटे यांनी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याचा शुभारंभ आज वंजारवाडी येथे गणेश भाऊंच्या हस्ते संपन्न झाला.वंजारवाडी गावठाण ते मधला मळा – पिंपळाचा मळा या भागातील लोकांना रस्त्याची खूप मोठी अडचण होती ती अडचण या रस्त्यामुळे दूर झाली आहे.योग्य वेळी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने गणेश भाऊ यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी भाजपाचे ता.उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब राख ग्रामपंचायत सदस्य विनोद रत्नाकर केकान धनंजय केकान माजी सरपंच हरिश्चंद्र बिनवडे माजी सरपंच रामदास राख माजी सरपंच दादासाहेब बिनवडे माजी उपसरपंच अंबादास बिनवडे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बिनवडे,सुनील कराड,भुजंग गीते,दत्तात्रेय राख,संतोष बिनवडे,ठकसेन बिनवडे,बाळासाहेब केकान,संजय कराड,अमोल बिनवडे,बाळासाहेब बिनवडे,उत्तम बिनवडे,मयूर कराड,भैया आंबेकर,माऊली बिनवडे,निलेश राख,नवनाथ राख,अविनाश राख,सुभाष बिनवडे,ऋषिकेश बिनवडे,सोमनाथ बिनवडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
