करमाळा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत आपल्या राजकीय सोयीसाठी उजनी धरणाच्या पाण्याचा वापर करू नये* ….प्रा रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून करमाळा बार्शी माळशिरस माढा सांगोला हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झाले आहेत. उजनी धरणात सध्या 15% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे अशा दुष्काळ परिस्थितीत उजनी धरणातील उर्वरित पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे.त्यामुळे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने आपली राजकीय सोय पाहुन पाणी सोडण्यास लावू नये असे मत प्राध्यापक रामदास झोळ यांनी पत्रकार परिषदे व्यक्त केल आहे.
यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसून यंदाच्या जानेवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने लोकांकडून ओरड सुरू झाली आहे.
परिणामी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी संबंधित प्रशासनामार्फत भीमा नदीत पाणी सोडले आहे. परंतु पुढचा पावसाळा येईपर्यंत आवश्यक त्या बाबीसाठी पाणी राखून ठेवावे लागणार असून पुणे जिल्ह्यातील काही धरणातून उजनी धरणात जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत आहे त्या उजनी धरणातील पाण्याचा वापर आपल्या राजकीय सोयीसाठी सुरू केला आहे
परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता धरणातील पाण्याचे योग्य ते नियोजन करावे अन्यथा जलसंबंधी आंदोलन करू आणि तसे निवेदनी एक-दोन दिवसात संबंधित प्रशासनाचे देण्यात येईल असा इशारा प्राध्यापक झोळ यांनी दिला आहे
या पत्रकार परिषदेवेळी शेतकरी संघटनेचे रवी गोडगे राजेश गायकवाड गोपीनाथ पाटील श्रीराम भोरे नागेश चव्हाण आदी उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!