उजनी कुकडी उपसासिंचन योजनेत तरटगाव परिसरातील गावांचा समावेश करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य पाटील यांची आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी
करमाळा प्रतिनिधी
उजनी कुकडी उपसा सिंचन योजनेत तरटगाव,पोटेगाव, संगोबा बंधाऱ्याचा समावेश करावा याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना निमगाव येथे दिले आहे.पाटील व ग्रामस्थांनी या निवेदनात म्हटले आहे की,शासन दरबारी प्रस्तावित असलेल्या भागासाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी कुकडी उपसा सिंचन योजनेत तरटगाव,पोटेगाव संगोबा येथील बंधाऱ्याचा समावेश व्हावा कारण फेब्रुवारी मार्चनंतर या भागातील पाणी पातळी पूर्णतः खालावली जाते परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो तसेच जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या ही पाण्याची खूप मोठी टंचाई निर्माण होते. तरी या भागातील शेतकऱ्यांचा विचार व्हावा असे म्हटले आहे यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की लवकरच याबाबत योग्य तो पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेतो असे आश्वासन दिले आहे.
