करमाळा

घारगावच्या सरपंचपदी श्रीमती आशा रामलिंग देशमुखे उ‌पसरपंचपदी दत्तात्रय मस्तुद यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी
घारगाव ग्रामपंचायत तिच्या नूतन सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे श्रीमती आशा रामलिंग देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय सिताराम मस्तुद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, या निवडणुकीत सरपंचपदी आशा देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तुद यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी पॅनल प्रमुख किरण पाटील तसेच, जगताप शिंदे गटाचे मा , उपसरपंच सतीश पवार, नारायण पाटील गटाचे इतर सर्व सदस्य मा, सरपंच लोचना पाटील,मा, सरपंच ,लक्ष्मी सरवदे,या, सरपंच अनिता भोसले, , ग्रामपंचायत सदस्य कविता होगले पाटील, आदी उपस्थित होते, तरी सरपंचपदी आशा रामलिंग देशमुखे व उपसरपंचपदी,‌ दत्तात्रय सिताराम मस्तुद यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी विनोद बनसोडे साहेब, तलाठी मयूर क्षिरसागर, सहाय्यक सोमनाथ खराडे, ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी निवडणुकीचे काम पाहिले, रामलिंग देशमुखे व संजय सरवदे यांनी भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सरवदे साहेबांनी केले त्यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group