नुतन पोलिस निरीक्षक धनंजय देवडीकर यांचा सावंत गटाच्या वतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहराचे सुपुत्र धनंजय देवडीकर यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सावंत गटाच्या वतीने नगरसेवक संजय सावंत यांच्या शुभहस्ते सावंत कार्यालयात फेटा हार नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत माजी नगरसेवक फारुक जमादार माजी नगरसेवक दिपक सुपेकर जमील काझी मार्तंड सुरवसे शिवाजी वीर संभाजी गायकवाड नागेश उबाळे बापू उबाळे यादव आदी जण उपस्थित होते.
देवडीकर हे गेली तेरा वर्षापासून मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत होते त्यांचे काम करण्याची पध्दत तसेच त्यांनी
अनेक गुन्हे चा तपास लावला आज त्यांची पदोन्नती होऊन पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना देवडीकर म्हणाले की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथ पर्यंत पोहोचलो आहे यापुढेही असेच काम करुन करमाळा शहराचे नाव लौकीक वाढवणार असल्याचे सांगितले आहे.
