शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनातून व प्रियांका गायकवाड यांच्या प्रयत्नातून पुणे येथील रूग्णाला एक लाखाची मदत
करमाळा प्रतिनिधी :- राजकारणातून समाजसेवेचा वसा अंगिकृत केलेल्या करमाळयाच्या शिवसेना माहिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्यामुळे पुणे येथील एका जीवदान मिळाले आहे. पुणे येथील रिक्षा चालक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत अनिल जगताप यांना गंभीर आजाराने ग्रासले असता त्यांना डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी सुचित केले होते. परंतु आर्थिक परिस्थितीचा विचार करता सदरील रूग्ण उपचार घेण्यासाठी विलंब करीत होते. त्यादरम्यान करमाळयाच्या शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड ह्या उन्हाळी सुट्टीसाठी पुणे येथे माहेरी गेल्या असता त्यांना सदरची बाब समजली त्यानंतर गायकवाड यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत यांच्या पुणे (धनकवडी व कात्रज) येथील कार्यालयात गेल्या व शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सदर रूग्णाला मदत मिळणेकामी पाठपुरावा केला. गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे सदर रूग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रक्कम रू. 1 लाखाचे अर्थसहाय्य करण्यात आले तसेच इतर सेवाभावी संस्थेच्या वतीनेही मदत मिळवून देण्यात गायकवाड यांना यश आले आहे. सदर रूग्णावर सह्रयाद्री हॉस्पिटल येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती रूग्णाचे नातेवाईक यांनी दिली असून त्यांनी शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.
यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, शिवसेना पक्ष हा सर्वसामान्यांचे हित जोपासणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, कमी खर्चात त्यांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. ज्यावेळी मला सदर रूग्णाविषयी कळाले त्यावेळी मी तात्काळ शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता सावंत यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहाय्यक अनभुले यांचेशी संपर्क साधून सदर रूग्णाला तात्काळ मदत मिळावी या करिता सुचित केले. त्यानुसार सदर रूग्णाला मदत झाली असून त्यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे गायकवाड यांनी शिवसेनेचे व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांचे विशेष आभार मानले आहेत.
