करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा एकदा नारायण पाटील गटाला भगदाड मिरगव्हाण येथील कार्यकर्त्यांचा पाटील गटातुन आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचा पूर्व भाग हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. या भागावरती माजी आमदार नारायण पाटील यांचे वर्चस्व होते, परंतु चालू पंचवार्षिक मध्ये अनेक विकास कामांच्या माध्यमातून व सातत्याने दहिगाव उपसा सिंचन योजना सुरळीत चालवून आमदार संजयमामा शिंदे यांनी या पूर्व भागातील अनेक गावात माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाला सुरुंग लावलेला असून त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.यापूर्वीच नारायण पाटील गटाच्या पूर्व भागातील पांडे, म्हसेवाडी, अर्जुननगर, कुंभेज, फिसरे,हिवरे इत्यादी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे गटात प्रवेश केलेला होता.
आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी मिरगव्हण येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणारामध्ये प्रामुख्याने बापूराव गोयकर, सुंदरदास गोयकर ,लक्ष्मण गोयकर ,बाळू गोयकर, यशवंत सेना तालुका अध्यक्ष शरदचंद्र घरबुडे ,खेळबा घरबुडे, किरण घरबुडे ,विश्वनाथ घरबुडे, संजोग घरबुडे ,रोहित गोयकर ,रवींद्र गोयकर, पंकज गंणगे, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग शिंदे ,दिनेश हाके, नागेश उघडे, विठ्ठल हाके ,राजेंद्र गोयकर ,विजय हाके, बाळू गोयकर, रोहन गोयकर ,अशोक गोयकर, बिरमल हाके आदींनी प्रवेश केला.या प्रवेशावेळी देवीचामाळ चे मा.उपसरपंच अनिल पवार, उंदरगाव चे उपसरपंच शिवाजी कोकरे ,कुंभारगावचे बाबुराव खुळे आदी उपस्थित होते.
