करमाळाताज्या घडामोडी

अयोध्यामध्ये प्रभु श्रीरामाचे मंदिराचे भूमिपूजन आम्हा सर्व शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट- महेश चिवटे.

करमाळा प्रतिनिधी  प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे भूमिपूजन आज  होत आहे हे आमच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, मंदिराच्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक शहीद झाले, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला मात्र या सर्वांचे आज सार्थक झाले आहे असे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले. तसेच याच आनंदात आज करमाळा शहरात जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले. श्रीराम मंदिर व्हावे यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सर्वात जास्त असून आज खऱ्या अर्थाने स्वर्गात सुद्धा हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असेही श्री. चिवटे यांनी सांगितले. तसेच आज करमाळा शहरात जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख प्रवीण कटारिया युवा सेनेचे तालुका संघटक विशाल गायकवाड उद्योजक भाऊ हजारे अण्णा ढाणे पाटील शेखर जाधव, बाळासाहेब कटारिया उपस्थित होते. यावेळी प्रभु श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन महेश कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. शिवभोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना पेढे वाटून श्रीरामचंद्रांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!