साडेचार तोळे सोन्याचे सुमारे चार लाखाचे किमतीचे दागिने चोरलेल्या संशयित आरोपीची मे.न्यायालयाकडून जामिनावर सुटका
करमाळा प्रतिनिधी सोन्याची बिस्किटं देत म्हणून फसवणूक केली तसेच चोरीच्या गुन्ह्यातील साडेचार तोळे सोन्याचे व सुमारे चार लाखाचे किमतीचे दागिने चोरलेल्या संशयित आरोपीची मे.न्यायालयाकडून जामिनावर सुटका दिनांक 16 5 2019 रोजी सायंकाळी साडेचार सुमारास करमाळा शहरातील दत्तपेठ येथील महिला पायल जात असताना अनोळखी दोन् इसम आले व तुमच्या गळ्यात सोने कमी आहे त्या बदल्यात आम्ही जास्त सोने देतो असे बोलून एक पिवळे धातूचे बिस्किट दिले परंतु ते पिवळे धातूचे बिस्कीट सोन्याचे नसून पितळेचे दिले असून त्या बदल्यात आपली फसवणूक केली आहे असे समजल्यानंतर फिर्यादीने करमाळा पोलीस स्टेशन येथे अनओळखी इसमविरुद्ध भारतीय न्याय संहिता गुन्हा क्रमांक 299/2025 कलम 318(4),3(5)प्रमाणे चोरीचा गुन्हा तसेच गुन्हा क्रमांक 273/2022 कलम 420तसेच34 प्रमाणे फसवणूकचा गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर आरोपींना करमाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली.
त्यातनंतर दोन दिवसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या वकिलांनी न्यायालयीन कस्टडी ची मागणी केली असता आरोपींना न्यायालयीन कस्टडीत घेण्यात आले
आरोपींना न्यायालयीन कस्टडी घेण्यात आल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला व या गुन्ह्यांमध्ये कशाप्रकारे आरोपींना खोट्या आशयाच्या गुन्ह्यामध्ये अडकून आरोपीचा कोणताही फसवणुकीमध्ये व चोरीमध्ये रोल नाहीये अशा प्रकारचा युक्तिवाद करून आरोपींची बाजू मे. कोर्टासमोर मांडली मे. कोर्टाने आरोपींच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना प्रत्येकी 25 हजाराच्या शर्ती व अटीवर जामीनावर मुक्त करण्यात आले.आरोपींच्या वतीने एडवोकेट अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.


