Thursday, April 30, 2026
Latest:
करमाळा

कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंतीनिमित्त एक मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

करमाळा, प्रतिनिधी १ मे २०२६ — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करमाळा येथे कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हमाल पंचायत करमाळा व स्व. सुभाष (आण्णा) सावंत जयंती समितीच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
स्व. सावंत हे हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच श्री आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस विशेष उपक्रमांनी साजरा केला जात आहे.
शुक्रवार, दि. १ मे रोजी सकाळी ९ वाजता हमाल भवन, मार्केट यार्ड, पोथरे नाका, करमाळा येथे अभिवादन व पुष्पांजली अर्पण सोहळा पार पडणार आहे. यानंतर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), ईसीजी तपासणी, औषध वितरण, डोळ्यांची तपासणी तसेच गरजू नागरिकांना चष्मा वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय चारा व फळे वाटपाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!