महिला आरक्षण विधेयकास विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या निषेधार्थ करमाळ्यात जनआक्रोश आंदोलन .
करमाळा. प्रतिनिधी: लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची २०२९ पासून अंमलबजावणी करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला संसदेत विरोधी पक्षांनी विरोध दर्शवल्याच्या निषेधार्थ करमाळा येथील दत्त मंदिर चौकात जनआक्रोश आंदोलन पार पडले. या आंदोलनात विविध क्षेत्रातील महिला, पदाधिकारी व मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
आंदोलनात भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, पंचायत समिती सदस्य सोनाली तकिक, नगरसेविका लता घोलप, नगरसेविका स्वाती फंड, वैशाली लवंड, अनिता यादव, ज्योती घोलप, साधना घोलप, मेघा लावंड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, नगरसेवक दीपक चव्हाण, मकाई सहकारी कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, सतीश निळ, मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, काका सरडे, नितीन तकिक, सचिन घोलप, अमोल जरांडे, रेवननाथ फरतडे, रेवणनाथ निकत, युवराज मगर, रामचंद्र राऊत, रविकिरण माळवे, प्रशांत जगदाळे, प्रदीप वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर यांनी केले. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. संसदेत महिलांच्या आरक्षणास विरोध केल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका करत आंदोलनातून निषेध नोंदविण्यात आला.


