Tuesday, June 23, 2026
Latest:
करमाळा

MHT-CET मध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटची दमदार कामगिरी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश अथर्व सपकाळ 97.09 टक्के टाईलसह अव्वल; गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचा पुन्हा ठसा

करमाळा, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम मार्गदर्शन देणाऱ्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी MHT-CET 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. प्रा. डॉ. महेश निकत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.
यंदाच्या निकालात अथर्व सपकाळ याने 97.09 टक्के टाईल मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ निखिल माने (95.97), ओम गोडगे (95.76), निकिता पवार (95.21), अंकिता मारकड (94.84), आयुष मोटे (94.39), सानिका बदे (94.19), प्रणव गोडगे (92.90), आयान फकीर (92.16), शिवम जाधव (90.97), पायल राऊत (90.69) आणि वैष्णवी दुधे (90.30) यांनी 90 पेक्षा अधिक टाईल मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
तसेच हरीकेश गोडगे (89.88), यश लांडगे (87.59), रणवीर काकडे (85.34), प्रतीक कामटे (83.45), सानिका शहा (82.97), वैभवी धोत्रे (81.92), अजिंक्या शिंदे (81.36), मानसी सितापुरे (81.36), उदय गलांडे (81.25), क्षितिज दरणे (78.63), हिंदवी पवार (77.88), प्रशमेश जगदाळे (76.17) आणि समीक्षा काटरिया (75.00) यांनीही घवघवीत यश मिळवत संस्थेची गौरवशाली परंपरा कायम राखली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित चाचण्या, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश निकत यांनी सांगितले. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यात आणखी गुणवंत विद्यार्थी घडविण्याचा संकल्प ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटने व्यक्त केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!