भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या सोलापूर(प) च्या जिल्हा संयोजक पदी अमोल पवार यांची निवड
करमाळा प्रतिनिधी- महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या प्रदेश व राज्यभरातील जिल्हा संयोजक यांच्या निवडीच्या घोषणा नुकत्याच झाल्या आहेत.यामध्ये सोलापूर(प) च्या जिल्हा संयोजक पदी करमाळा येथील अमोल पवार यांची निवड करण्यात आली आहे. अमोल पवार यांची भाजपच्या विचाराचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे.यापूर्वी भाजपा युती शासनाच्या काळात त्यांनी मकाई सहकारी साखर कारखान्यात शासन नियुक्ती संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायत मध्ये त्यांनी उपसरपंच म्हणून काम पहिले आहे.आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी भाजपाची संघटनेची अनेक पदे व जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे सोलापूर प. चे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यांच्या या निवडीबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
चौकट
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी माझी ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या सोलापूर(प) च्या जिल्हा संयोजक म्हणून दिलेली जबाबदारी मी एक संधी म्हणून पार पाडेल.भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
@अमोल पवार,
नूतन जिल्हा संयोजक
ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या सोलापूर(प)


