लखीमपुर खिरी येथील शहीद शेतकरी आंदोलकांना काँग्रेस पक्षातर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली
करमाळा प्रतिनिधी
लखीमपुर खिरी येथील आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार चाकी गाडीने चिरडल्यामुळे संपूर्ण देशात संतप्त अशी लाट उसळली होती व त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्याचे व्यापारी .शेतकरी. तसेच छोटे-मोठे दुकानदार यांना आवाहन केले होते त्याचाच एक भाग म्हणून करमाळा येथे काँग्रेस आय पक्षातर्फे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली लखिमपुर खिरी येते शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला यावेळेस करमाळ्यातील शेतकरी. व्यापारी गाळेधारक तसेच हमाल पंचायतीतील सर्व हमाल एकत्रित झाले होते व त्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला होता यावेळेस उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या आक्रमक भाषणातून भाजपच्या हिटलरशाही धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळेस भारिप चे पदाधिकारी देवा लोंढे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला तसेच भाजपाचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी गुरसुळी चे माजी सरपंच दत्तात्रय आडसूळ राष्ट्रवादीचे नेते गोवर्धन चवरे पाटील मुस्लीम विकास परिषदेचे हाजी फारुख बेग यांची भाषणे झाली आंदोलनाच्या शेवटी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी बीजेपीच्या हिटलरशाही धोरणावर हल्ला चढवताना सांगितले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि कित्येक महिने झाले शेतकरी हा शांतते मध्ये त्याच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहे व या आंदोलनाचा दसका घेऊन बीजेपी चे मंत्री पदाधिकारी व नेते या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे हिंसक मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व बीजेपी ने जर त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास व शेतकऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले त्वरित न थांबविल्यास केंद्रातील मोदी सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची ताकद काय असते हे शेतकरीवर्ग दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा खरमरीत शब्दांमध्ये सावंत यांनी मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला व समाचार घेतला या आंदोलनाला भोसे गावचे सरपंच भोजराज सुरवसे अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार शिवसेनेचे नेते संजय शिंदे हमाल पंचायत करमाळाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अॅड राहुल सावंत नगरसेवक संजय सावंत माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत मुसळे नगरसेवक राजू आव्हाड नगरसेवक गोविंद किरवे माजी नगरसेवक रविंद्र कांबळे शेतकरी नेते अभिजीत सावंत खलील मुलानी शरद शिंदे विठ्ठल इवरे बाळासाहेब गोडसे बबन जाधव बाबुराव आढाव राजेंद्र रोडे गोपीचंद झिंजाडे दिगंबर झिंजाडे पिंटू रोही सुनील काळे अरुण गाढवे अंगद झिंजाडे मंगेश शिरसट गणेश सावंत योगेश काकडे महेश भागवत अकबर बेग समीर शेख गमंड शेख साजिद बेग असलम नालबंद पप्पू रंधवे रवी सुरवसे मुनाज शेख मैनुद्दिन शेख अमोल मोरे रामा करंडे धोंडीराम अडसूळ पिंटू शेख राजू नालबंद आदी् प्रमुख मान्यवर उपस्थित होते या आंदोलनासाठी शेतकरी वर्ग. हमाल वर्ग .व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या आंदोलनाचे निवेदन करमाळा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जगदाळे यांनी स्वीकारले.
