नवरात्रीनिमित्त श्री कमलाभवानी मंदिरातील माही डेकोरेशनच्या सजावटीने भाविक झाले मंत्रमुग्ध
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्री कमलाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्ताने कै. बाबासाहेब गोडसे यांच्या स्मरणार्थ माही डेकोरेटस यांनी सुंदर सजावट केली असून या सजावटीने भाविकांचे मन प्रसन्न केले आहे. श्री कमलाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक या सुंदर मनमोहक सजावटीचे कौतुक करत आहे .अनेक वर्षानंतर कोरोनाचे संकटातून दिलासा मिळाल्यानंतर प्रथमच अशी उत्तम सजावट केल्याने भाविकांना या सुंदर सजावटीचा आनंद मिळाला आहे. या सजावटीचे मुख्य आकर्षण हे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे. या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या फलकावर पोलीस, सफाई कामगार, डॉक्टर, यांचे चित्र दाखवून त्यामध्ये मधोमध श्री कमलाभवानी मातेची प्रतिमा सादर केली आहे. यामधून त्यांना कोरोना कालावधीमध्ये पोलीस डॉक्टर सफाई करणारे कर्मचारी हे तीनही देवासमान कोव्हीड वारीयर्स आहेत असा सामाजिक संदेश देण्यात आला आहे तसेच या फलकाच्या चारही बाजूने फुलांची सजावट केली आहे तसेच मुख्य मंदिराच्या चारही बाजूंनी विविध रंगाच्या फुलांची सजावट केली असून मंदिराच्या गाभार्यात हिरव्या पानावर विविध रंगाच्या फुलांनी सजावट केली आहे श्री कमलाभवानी मंदिरात या प्रकारची सजावटीची योजना प्रथमच केल्याने मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे लक्ष जात असून या सजावटीने भाविक लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. या सजावटीसाठी माही डेकोरेशनने खूपच मेहनत घेतली आहे. यासाठी संदीप वाघे मंगेश गोडसे ओंकार राऊत रोहित पवार आकाश गरड समाधान गोळे सागर गोळे यांचे सहकार्य लाभले.याप्रसंगी माहिती डेकोरेशन सादर करण्यास परवानगी दिल्याने श्री कमलाभवानी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सदस्याचे माही डेकोरेशनने आभार मानले आहेत.
