Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळा

गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लब गणेश जयंती साध्यापद्धतीने साजरी करणार -प्रशांत ढाळे

करमाळा प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब यंदाच्या वर्षी गणेश जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविक भक्तांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून यावर्षी होम हवन पूजा करून गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे करमाळा शहरातील भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन गणेश जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लब दरवर्षी गणेश जयंती उत्सव शहरातील वेताळपेठ   येथे मोठ्या प्रमाणात साजरा करून संपूर्ण करमाळा शहरातील नागरिकांना महाप्रसाद दिला जातो या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गुण्यागोविंदाने या उत्सवात सहभागी होतात. मात्र यंदाच्यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी मिळुन एकमताने हा निर्णय घेतला असून प्रशासनाने दिलेल्या नियम अटीचे पालन करून गणेश जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचे प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group