कै.बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानमार्फत वनविभागात मुक्या प्राण्यांना पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कै.बाबूराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानमार्फत करमाळा शहरालगत असलेल्या वनविभागात मुक्या प्राण्यांना व पक्षाना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी स्वतः खर्च करून टॅंकरने पाणी देत आहेत, हा उपक्रम गेल्या ४ वर्षापासून राबवित आहेत.कै.बाबूराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानमार्फत करमाळा शहरात अनेक उपक्रम राबविले जातात त्यापैकीच एक हा उपक्रम आहे, यामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात, त्यांना वनविभागात तयार केलेल्या पाणवठ्यावर पाण्याची टॅंकरने २४ हजार लिटर पाण्याची सोय केली आहे.
