करमाळाराजकीय

बंडखोर आमदारच्या पत्नी हि आमची बहीण राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पाठवणार पैठणी साडी- हनुमंत मांढरे पाटील*

करमाळा प्रतिनिधी
शिवसेना बंडखोर सांगोला तालुका आ.शहाजी बापू पाटील यांची पत्नी हि आमची बहीण आहे नुकतेच महाराष्ट्र सरकार मधील काही आमदार हे बंडखोरी करून गुवहाटीत एका हाॅटेल मध्ये वास्तव्यास आहेत आणि त्या मध्ये सांगोला तालुका आ शहाजी बापू पाटील हे देखील आहेत त्यामुळे मुळे एका निष्ठावंत कार्यकर्ते ने आमदार साहेबांना फोन करून माहिती घेत आसताना एक ऑडिओ क्लीप या दोघांच्या संभाषणाची वायरल झाली आहे यात.आमदार साहेब म्हणतात दिडशे एकर जमीन विकली बायकोला लुगडं नाही तालुका विकास निधी मिळत नाही आता तालुक्याचा विकास होइल असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत मला आमदार साहेबांना सांगायचं आहे तुमची बायको हि आमची बहीण आहे आणि तुम्ही तुमच्या राजकारण साठी स्वार्थासाठी आमच्या बहिणीची इतकी पण अब्रू नव्हती घालवायची तुम्हाला बायको ला लुगडं घेता येत नाही तर मग हिमालयात जायचं कशाला लग्न करायचं व्यक्ती गत स्वार्थासाठी तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून स्वताःच्या आर्थिक हव्यासापोटी आपण या बंडखोर सोबत सुरत गाठले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती दोनदा विजय मिळवला महाराष्ट्रचा दबदबा निर्माण केला होता महाराष्ट्र ची ताकद दाखविली होती त्याच महाराष्टचा सौदा तुम्ही सुरतला जाऊन केला तुम्हाला महाराजांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही.            महाराष्ट्र राज्या मध्ये राजकीय दृष्टीने आदर्श तालुका मानला जायचा त्या तालुक्याची अब्रू तुम्ही मा.आ.कै.गणपतराव देशमुख यांच्या निधन नंतर अडीच वर्षात महाराष्ट्रात घालवली आबासाहेबांना 55 वर्षाच्या कालावधीत नसतील का कोणी मंत्री पदासाठी ऑफर दिली पण आबासाहेबांनी व्यक्ती गत स्वार्थासाठी तालुक्यातील जनतेची दिशाभूल कधीच केली नाही त्यांनी तत्वाचे राजकारण केले आणि तुम्ही स्वार्थाचे राजकारण करत आहात स्वार्थासाठी साठी लाचारी करत आहात आर्थिक हव्यासापोटी दिडशे एकर जमीन विकली नाही तर रात्रीत महाराष्ट्रात आदर्श म्हणून कै आबासाहेबांच्या नावाने ओळख असणारा तालुका विकला आहे राहिला प्रश्न विकास निधी चा दि 28 मे रोजी 9 कोटी रुपये विकास निधी मधून अनेक उदघाटन केली मग तो निधी कोणी दिला व्यक्तिगत स्वार्थासाठी तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वरती टीका करून राक्षसी राजकीय इच्छाशक्ती आसणारे कडून स्वताःची पाठ थोपटून घ्यायचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे परंतु घोडा मैदान जवळच आहे 2024 बघू असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group