Monday, April 21, 2025
Latest:
ताज्या घडामोडीराजकीय

जनतेतुन नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा विधेयक मंजुर

मुंबई  जनतेतुन नगराध्यक्ष होणार विधेयक मंजुर करण्यात आले आहे.2006 साली थेट जनतेमधुन नगराध्यक्ष करावा असा निर्णय घेण्यात आला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (यांनी थेट नगराध्यक्ष निवड व्हावी याबाबत विधेयकावर विधानसभेत प्रस्ताव मांडला होता. तर नगराध्यक्षांची निवड ही जनतेून होईल. मात्र यासाठी विरोधकांकडून विरोध करण्यात आला. पण आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेतला. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो. एखादा गुंड एखाद्या वार्डात पैशाच्या जीवावर निवडून येऊ शकतो, पण पूर्ण शहरात पैशाच्या जीवावर तो निवडून येऊ शकत नाही. मग यावर मुख्यमंत्री जनतेतून निवडा अशी मागणी विरोधकांनी केली. मुख्यमंत्र्यांची जनतेतून निवड कसी करायची, मग घटनेत बदल करायचा का? आमचं सरकार घटनेनुसारच काम करत आहे.”दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला म्हणजे तो एका नगरविकासाचा नसतो तर तो सरकारचा निर्णय असतो.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group